लॉकडाउनच्या खिडकीतून भाग ३
शेतकर्यांची विक्री साखळी भाग दोनमध्ये आपण कोरोना विषाणूच्या महामारीने जगभरातील माणसांचा एकमेकांवरील विश्वास उडवला आहे. त्यामुळे अन्नधान्य, फळे, भाजीपाला, दुध आदी खाद्यपदार्थाची खरेदी लोक खात्री असल्याशिवाय करणार नाहीत. म्हणजे खरेदी करताना त्यात काही धोका नाही ना याची खात्री करण्याचा प्रयत्न करतील. ग्राहकांच्या बदलत्या मानसिकतेचा विचार करून शेतकरी, त्याच्या कंपन्या, गट किंवा शेतकरी पुत्र यांनी सध्याची विक्री व्यवस्था बदलण्याचा विचार करण्याचा प्रयत्न करण्यास हरकत नाही. सध्या नाशिकमध्ये द्राक्षांचा हंगाम सुरू असून संचारबंदीमुळे द्राक्षे देशांतर्गत बाजार पेठेमध्ये पाठवणेही शक्य होत नाही. तसेच युरोपसह इतर देशांमधून मागणी घटल्यामुळे त्यांच्या निर्यातीवरही परिणाम झाला आहे. यामुळे नाशिक शहरालगतच अनेक द्राक्ष बागायतदार थेट ग्राहकांना विक्री करता येईल का याचा विचार करीत आहेत. यासाठी समाज माध्यमांवर जाहिरातीही केल्या जात आहेत. तुलनेने स्वस्त मिळत असल्याने ग्राहकांकडून द्राक्षांना मागणीही आहे. मात्र, एखाद्या शहराच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या मागण्यांची पूर्तता करणे शेतकर्यांना शक्य होत नाही...