Posts

Showing posts from April, 2020

लॉकडाउनच्या खिडकीतून भाग ३

शेतकर्‍यांची विक्री साखळी भाग दोनमध्ये आपण कोरोना विषाणूच्या महामारीने जगभरातील माणसांचा एकमेकांवरील विश्वास उडवला आहे. त्यामुळे अन्नधान्य, फळे, भाजीपाला, दुध आदी खाद्यपदार्थाची खरेदी लोक खात्री असल्याशिवाय करणार नाहीत. म्हणजे खरेदी करताना त्यात काही धोका नाही ना याची खात्री करण्याचा प्रयत्न करतील. ग्राहकांच्या बदलत्या मानसिकतेचा विचार करून शेतकरी, त्याच्या कंपन्या, गट किंवा शेतकरी पुत्र यांनी सध्याची विक्री व्यवस्था बदलण्याचा विचार करण्याचा प्रयत्न करण्यास हरकत नाही. सध्या नाशिकमध्ये द्राक्षांचा हंगाम सुरू असून संचारबंदीमुळे द्राक्षे देशांतर्गत बाजार पेठेमध्ये पाठवणेही शक्य होत नाही. तसेच युरोपसह इतर देशांमधून मागणी घटल्यामुळे त्यांच्या निर्यातीवरही परिणाम झाला आहे. यामुळे नाशिक शहरालगतच अनेक द्राक्ष बागायतदार थेट ग्राहकांना विक्री करता येईल का याचा विचार करीत आहेत. यासाठी समाज माध्यमांवर जाहिरातीही केल्या जात आहेत. तुलनेने स्वस्त मिळत असल्याने ग्राहकांकडून द्राक्षांना मागणीही आहे. मात्र, एखाद्या शहराच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या मागण्यांची पूर्तता करणे शेतकर्‍यांना शक्य होत नाही...

लॉकडाउनच्या खिडकीतून भाग २

विश्वासघातानंतरची सावधानता  पूर्वी म्हणजे फार पूर्वी भारतात दोन राजांमध्ये युद्ध होत, तेव्हा सूर्य मावळल्यानंतर ते थांबत असे. सूर्योदयापर्यंत त्या त्या तळावरील सैनिक बिनधास्त विश्रांती घ्यायचे. पुढे शत्रूकडून विशेषता अरबांकडून रात्रीची वेळ पाहुनच हल्ले होऊ लागले आणि सूर्यास्तानंतर युद्ध बंदीचा नियम कपोलकल्पीत वाटायला लागला. कुठल्याही देशातून लोक दुसर्‍या प्रदेशात सहज प्रवास करीत होते. मात्र., या प्रवासाच्या आडून एकमेकांच्या देशातील गुप्त माहिती मिळवण्याचे प्रकार वाढल्याने असावे, पण इतर देशातील लोकांना ओळखपत्राशिवाय व केवळ अधिकृतपणेच प्रवेश देण्यासाठी पासपोर्टने जन्म घेतला. त्यातीलही पळवाटांचा शोध घेऊन विश्वासघात होऊ लागल्याने व्हिजा या नव्या व्यवस्थेने जन्म घेतला. एखाद्या व्यक्तीकडे पासपोर्ट असला तरी आपल्या देशात त्याला येण्याच्या कारणाची माहिती घेऊन व त्याची खातरजमा करूनच प्रवेश देणे म्हणजे व्हिजा. त्यातही अनेकवेळा फसवणूक होऊ लागल्याने विमानतळांवर कुठल्या कुठल्या देशांमधील नागरिकांची कसून चौकशी करायची याबाबतही अलिखित नियम ठरले आणि माणसाच्या परस्परांविषयीच्या अविश्वासाची पातळी...

लॉकडाउनच्या खिडकीतून

जगभरात गुणाकाराच्या गतीने वाढणार्‍या करोना विषाणूचा प्रसार भारतातही त्याच वेगाने झाला तर आपली व्यवस्था केवळ अपुरीच पडणार नाही, तर त्या महामारीत ती अक्षरश: वाहून जाईल. त्यामुळे ती महामारी तिच्या परम बिंदूला आपल्या देशात पोहोचू नये म्हणून भारत सरकारने संपूर्ण देशात लॉकडाउन २४ मार्चपासून लागू केले आहे. तेव्हापासून देशातील सर्वच उद्योग, व्यवसाय बंद आहेत. जवळपास सर्वच लोक घरांमध्ये बसून आहेत. प्रवास बंद आहेत, वाहने बंद आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहे. कारखाने बंद आहेत आणि हे सर्व काही चालवणारा माणूस घरात लॉकडाउन झाला आहे. त्याला भाजी, किराणा आणण्याची काळजी लागली आहे. घरात धान्य, किराणा पुरेसा नसल्याने चिंतित होऊन तो पोलिसांचा डोळा चुकवून रस्त्यावर उतरून गर्दी करण्यात धन्यता मानत आहे. आपल्या भागात करोना नसल्याने उगीच घाबरण्याचे कारण नसल्याचा युक्तीवाद करून तो कृतीचे समर्थन करीत आहे. तसेच वेळ जात नसल्याने घराच्या खिडकीत, गॅलरीत उभा राहून रस्त्यावरून जा ये करीत असलेली वाहने न्याहाळत आहे. लोक अजूनही या संचारबंदीचे पालन करीत नसल्याने चिंता व्यक्त करीत आहे. रस्त्यावर जाण्याची धडपड करणार...