Posts

Showing posts from November, 2019

राज्यातील बंड आणि नाशिककर

राज्यातील बंड आणि नाशिककर राजीव गांधी यांनी पक्षांतर्गत बंदी कायदा आणल्यानंतर १९९१ पासून राज्यात शिवसेना, काँग्रेस, शिवसेना व आता राष्ट्रवादी काँग्रेस या राजकीय पक्षांमध्ये झालेल्या प्रत्येक बंडात नाशिक जिल्ह्यातील आमदारांनी सहभाग घेतला  आहे. यामुळे क्रांतिकारकांची भूमी असलेल्या नाशिक जिल्ह्यातील आमदार पक्षांतर्गत बंडखोरीतही मागे नसल्याचे गेल्या २९ वर्षांत चार वेळा दिसून आले आहे.  तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी पक्षांतर बंदीचा कायदा केल्यानंतर महाराष्ट्रात पहिले घाऊक पक्षांतर शिवसेनेचे तत्कालीन आमदार छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली झाले. त्यावेळी शिवसेनेचे ५२ आमदार होते. त्यामुळे पक्षांतरासाठी एकतृतीयांशच्या हिशेबाने १८ आमदारांचा गट हवा होता. त्यासाठी भुजबळ यांनी १८ आमदारांच्या स्वतंत्र गटाची स्थापना केली. त्या पत्रावर आपली सही बनावट आहे, असे देवळालीचे तत्कालीन आमदार बबनराव घोलप यांच्यासह सहा जणांनी सांगत त्या बंडातून माघार घेतली; परंतु तोपर्यंत भुजबळ यांना हवा असलेला १८ आमदारांचा गट तेव्हाचे विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांनी स्थापनही केला होता. त्यामुळे सहा आमदारा...